Psalms 76

मुख्य संगीतकारा साठी, तंतुवाद्यावरचे आसाफाचे स्रोत्र गीत.

1यहूदात देव कळाला आहे,
इस्राएलमध्ये त्याचे नाव थोर आहे.
2शालेममध्ये त्याचा मंडप आहे,
आणि सियोनेत त्याची गुहा आहे.
3तेथे त्याने धनुष्य बाण, ढाली, तलवारी
आणि इतर शस्त्रे मोडून टाकली आहेत.

4तू जेथे शत्रूंना ठार केलेस,

त्या डोंगरावरून उतरताना तू तेजस्वी चमकतोस आणि तुझे वैभव प्रकट करतोस.
5जे हृदयाचे धाडसी ते लुटले गेले आहेत,
ते झोपी गेले,
सर्व योद्धे असहाय्य झालेत.

6हे याकोबाचा देवा, तुझ्या युद्धाच्या आरोळीने,

रथ आणि घोडे दोन्हीपण झोपी गेलेत आहेत.
7तू, होय तुच, ज्याचे भय धरावे असा आहेस.
कोण असा आहे, तू रागावतोस तेव्हा तुझ्या दृष्टीस उभा राहीन?

8तुझा न्याय आकाशातून आला,

आणि पृथ्वी भयभित व नि:शब्द झाली.
9देवा, तू, पृथ्वीवरील खिन्न झालेल्यांना तारायला,
न्याय अमलांत आणण्यास उठला आहे.

10खचित त्या लोकांविषयी तुझा क्रोधित न्याय, तुला स्तुती मिळवून देईल.

तुझा क्रोध तू पूर्णपणे प्रगट केला आहे.

11परमेश्वर तुमचा देवाला याला नवस करून फेडा,

ज्याचे भय धरणे योग्य आहे, जे तुम्ही त्याच्या सभोवती आहात, त्याला भेटी आणा.
तो अधिकाऱ्यांच्या आत्म्याला नम्र करतो.
पृथ्वीच्या राजांना तो भयावह असा आहे.
12

Copyright information for MarULB